सेन्सेक्स-निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक

 सेन्सेक्स-निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक

सेन्सेक्स-निफ्टीत विक्रीचा दबाव, परंतु बँकिंग शेअर्समधील खरेदीने शेवटच्या दिवशी दिला आधार

मुंबई, दि. 4 (जितेश सावंत) : सलग पाचव्या दिवशी भारतीय बाजारात तेजी पसरताना दिसली.तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या विजयामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्सने 1400 अंकांच्या आणि निफ्टीने 430 अंकांच्या उसळीसह नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. राज्याच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर, परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भाजपला काही तरी झटका बसेल अशी चिंता होती परंतु निकालामुळे ती दूर होताना दिसली. सेन्सेक्सने 68,918.22 चा लाईफ टाईम उच्चांक गाठला, तर निफ्टीने इंट्रा-डे सौद्यांमध्ये 20,702.65 चा नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. दोन्ही बेंचमार्कने एका वर्षातील सर्वात मोठा एक दिवसीय नफा नोंदवला.
बँक निफ्टी 1668 अंकांच्या उसळीसह 46,484 अंकांचा ऐतिहासिक उच्चांकांवर पोहोचला. निफ्टी मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल इंडेक्स देखील त्यांच्या उच्चांकावर बंद झाले

सत्ताधारी पक्षाचा विजय,सकारात्मक जागतिक संकेत,व्याजदर कपातीची अपेक्षा,सलग तीन महिने निव्वळ विक्रेते राहिल्यानंतर, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) नोव्हेंबरच्या अखेरीस पुनरागमन केले या कारणांमुळे बाजाराने आज नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला. काही विदेशी ब्रोकरेज फर्मच्या मते तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपचा विजय हा एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा चांगला होता आणि म्हणूनच, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदींच्या विजयाच्या अपेक्षांना वाढल्या असल्याने बाजारासाठी ते उत्साहवर्धक आहे.

परंतु बाजारासाठी ह्या गोष्टी अल्पकालीन ठरतील,
बाजाराचा फोकस नंतर मूलभूत गोष्टींकडे वळेल बाजारचे फंडामेंटल तसेच भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या निधीकडे राहील. त्यावर बाजाराची दिशा ठरेल .तांत्रिकदृष्ट्या बाजार हायली ओव्हरबॉट झोन मध्ये आहे (The market is currently in a highly overbought zone.) गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधानतेने गुंतवणूक करावी आणि बाजाराच्या पडझडीचा लाभ घ्या तसेच दीर्घकालीन गुंतवणूक करावी.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
4 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *