सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक

 सेन्सेक्सने गाठला नवा उच्चांक

मुंबई, दि. 24 (जितेश सावंत):  सलग चार आठवड्यांची तेजीची मालिका २३जून रोजी संपलेल्या आठवड्यात थांबली.अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला परंतु फेडरल रिझव्‍‌र्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांची मूड खराब करणारी टिप्पण्णी,चीनची ग्रोथ संबंधीची चिंता, बँक ऑफ इंग्लंडने केलेली सरप्राईज दरवाढ,मान्सूनला झालेला उशीर यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना ठेच पोहोचली व आठवड्याच्या शेवटी नफा वसुलीमुळे बाजार घसरताना दिसला.

शुक्रवारी वॉल स्ट्रीट फेडच्या चिंतेमुळे घसरला.

भारतीय बाजार देखील विक्रमी पातळी गाठल्यानंतर काहीसा नर्व्हस झाला आहे. बाजार थोडासा कमकुवत झाला आहे . पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष जागतिक घडामोडींकडे राहील. रशियात गृहयुद्ध असल्याने सध्या रशियाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. देशाची खाजगी सेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॅगनर ग्रुपने उठाव केला आहे.

Technical view on nifty-. मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजाराने (सेन्सेक्सने) या
आठवड्यात विक्रमी पातळी गाठली.निफ्टी अगदी थोड्याश्या फरकाने मागे राहिला . शुक्रवारी निफ्टीने 18665.5 चा बंद भाव दिला. विक्रमी पातळी गाठल्यानंतर बाजरात नफावसुली वाढली. बाजार तांत्रिक दृष्ट्या कमकुवत झाला आहे.

निफ्टीसाठी 18631-18615-18600 हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल.व निफ्टी 18555-18531-18478-18464-18432-18368 हे स्तर गाठू शकते.

सेन्सेक्स 216 अंकांनी घसरला

आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी बाजारात नफावसुली पहावयास मिळाली. अत्यंत अस्थिर अश्या सत्रात जागतिक बाजारातील कमकुवतपणा व बहुतांश क्षेत्रांतील विक्री याचा असर जाणवला.
बाजाराची सुरुवात सकारात्मक नोटवर झाली आणि बाजार विक्रमी उच्च पातळीच्या जवळ पोहोचला परंतु नफा वसुलीने सुरुवातीचा सर्व नफा खोडून टाकत बाजाराने सत्र दिवसाच्या नीचांकी पातळीवर संपवले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 216.28 अंकांनी घसरून 63,168.30 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 70.50 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,755.50 चा बंद दिला. Sensex falls 216 pts

निफ्टी 18800 च्या वर
अजून एका अस्थिर अश्या सत्रात भारतीय बाजार शेवटच्या तासात झालेल्या जोरदार खरेदीमुळे तेजीसह बंद झाला.कमकुवत आशियाई बाजारांमुळे,
भारतीय समभागांनी सपाट सुरुवात केलीआणि जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसा विक्रीचा जोर वाढत गेला परंतु शेवटच्या तासातील खरेदीमुळे तोटा कमीझाला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 159.40 अंकांनी वधारून 63,327.70 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 61.20 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,816.70 चा बंद दिला. Nifty ends above 18800
बाजार विक्रमी पातळीवर बंद झाला .

भारतीय शेअर बाजाराने बुधवारी नवा विक्रम रचला सेन्सेक्स आणि निफ्टीने त्यांच्या आत्तापर्यंतच्या उच्चांकावर बंद दिला. कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर, बाजाराची सुरुवात सपाट नोटवर झाली परंतु लगेचच सेन्सेक्सने 63,588.31 च्या नवीन विक्रमी पातळीला स्पर्श केला तर निफ्टी 18,887.60 च्या सर्वकालीन उच्च पातळीच्या थोडासा खाली राहिला. पॉवर,ऑइल अँड गॅस आणि आय.टी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराने विक्रमी पातळी गाठली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 195.45 अंकांनी वधारून 63,523.15 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 40.10 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,856.80 चा बंद दिला. Market at record closing high

सेन्सेक्स 284 अंकांनी घसरला

गुरुवारी भारतीय बाजाराने अत्यंत अस्थिर अश्या दिवशी मागील सत्रातील नफा पुसून टाकला. नकारात्मक सुरुवात होऊन देखील निफ्टीने पुन्हा 18,887.60 च्या विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचण्यात यश मिळवले तर सेन्सेक्सने सुरुवातीच्या सत्रात 63,601.71 हा नवीन उच्चांक गाठला.परंतु दुपारनंतर सर्व क्षेत्रांतील विक्रीमुळे बाजारात नफा वसुली दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 284.26 अंकांनी घसरून 63,238.89 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 85.50 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,771.30चा बंद दिला. Sensex falls 284 points

सेन्सेक्स 260 अंकांनी घसरला

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार घसरला. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली.सुरुवातीच्या घसरणीनंतर बाजारात थोडी रिकव्हरी दिसली परंतु शेवटच्या तासातील नफा वसुलीमुळे निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर ओढले.गेले. अदानी Ent 7%, RIL, SBI 1% नी कोसळल्यामुळे बाजारातील घसरण वाढली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 259.52 अंकांनी घसरून 62,979.37 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 105.80 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,665.50 चा बंद दिला. Sensex falls 260 pts,Adani Ent crashes 7%, RIL, SBI 1%

(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
24 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *