रिझर्व्ह बँकेच्या लाभांशामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक
मुंबई, दि. 26 (जितेश सावंत) : देशातील सार्वत्रिक निवडणूकीला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यानंतर बाजार हळूहळू खाली घसरत गेला. कमी मतदानाचा कल हा नेमका कोणत्या बाजूला हे पडलेले कोडे त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारानी लावलेला विकीचा सपाटा यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आणि त्यांनी देखील नफा वसुलीला सुरुवात केली. After the general elections began, the market gradually declined after each phase due to low voter turnout and caution from foreign investors.
Nifty has surpassed the 23,000 mark for the first time.
परंतु 24 मे रोजी संपलेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही आपल्या सर्वकालीन विक्रमी उच्चांक गाठला.या वाढीमागे अनेक कारणे होती. त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आरबीआयद्वारे आतापर्यंतचा सर्वाधिक लाभांश,रिझर्व्ह बँकेने रिझर्व्ह बँकेने 2 लाख कोटी रुपयांहून अधिक विशेष लाभांश जाहीर केल्यानंतर सेन्सेक्स 1,000 अंकांनी वाढला तसेच निवडणुकीचे निकाल बाजाराशी सुसंगत असण्याची अपेक्षा आणि लार्जकॅप आयटी आणि बँकिंग शेअर्समध्यील खरेदी या सगळ्याच्या प्रभाव भारतीय बाजारावर पडताना दिसला. निफ्टीने पहिल्यांदा 23,000 चा टप्पा ओलांडला.
But both the Sensex and Nifty reached their all-time highs in the week ending on May 24. There were several reasons for this surge, with the most significant being the highest-ever dividend paid by the RBI.
निफ्टीने जानेवारीमध्ये 22,000 चा टप्पा ओलांडला होता आणि 24 मे रोजी 23,000 चा नवा उच्चांक गाठला. निफ्टीला 22,000 ते 23,000 पर्यंत पोहोचण्यासाठी 88 ट्रेडिंग दिवस लागले. या 1000 अंकांच्या वाढीमध्ये ICICI बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, SBI, रिलायन्स आणि भारती एअरटेलने 75% पेक्षा जास्त योगदान दिले आहे.
दुसरीकडे, निफ्टीला खाली खेचणाऱ्या कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर राहिली. यामुळे निफ्टीत 19% घसरण झाली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सचे अनुक्रमे 5% आणि 4% नकारात्मक योगदान होते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून $3 अब्ज पेक्षा जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत, तरीही बाजारात तेजी कायम आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यांत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) बाजारात केलेली गुंतवणूक.
गुंतवणूकदार आता 31 मे रोजी जाहीर होणाऱ्या मार्च तिमाहीच्या GDP डेटाची आणि 1 जून रोजी होणाऱ्या एक्झिट पोलच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. Investors are eagerly awaiting the release of the March quarter GDP data on May 31 and the exit poll results on June 1.
Technical view on nifty
शुक्रवारी निफ्टीने 22957.1चा बंद भाव दिला.निफ्टीसाठी 22901-22859-22800-22782-22730-22719-22687-22600हे महत्वाचे सपोर्ट(Support)आहेत.
हे तोडल्यास निफ्टी 22536-22517-22475.8-22440-22420-22389 हे स्तर गाठेल.वरच्या स्तरावर निफ्टीसाठी 22963–22986 23019-23082-23138-23177 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.
मार्केट ओव्हर बॉट झोन मध्ये असल्याने गुंतवणूकदारानी सावध पवित्रा घेण्याची गरज आहे.
( लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत.)
jiteshsawant33@gmail.com
JS/ML/SL
26 May 2024