देवाच्या आळंदीत धर्मांतराची खळबळजनक घटना
पुणे,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील देवाची आळंदी या तीर्थक्षेत्री धर्मांतराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर गुन्ह्याचा अनुषंगाने या संदर्भातील घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आळंदी रस्तावरील साठे नगर परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे.
“तुमचे देव सैतान आहेत, त्यांना पाण्यात बुडवा’ असे सांगत दुसरा धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याप्रकरणी आळंदी आणि दिघी अशा दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येशूचे रक्त असल्याचे सांगून द्राक्षाचा रस पाजत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उद्धव नागनाथ कांबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर सुधाकर बाबुराव सूर्यवंशी (६५, रा. धानोरी, पुणे) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी सुधाकर सूर्यवंशी याच्यावर दोन्ही पोलिस ठाण्यात १५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन धर्मात द्वेष निर्माण करून जातीय तेढ केल्याप्रकरणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू आहे
SL/KA/SL
7 Jan. 2023