ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अनिल सोनार यांचे निधन

धुळे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अनिल सोनार यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ‘शब्दुली’ नेहरूनगर, देवपूर, दुपारी त्यांच्या पार्थिवावर देवपुरातील एकवीरा देवी मंदिराशेजारील अमरधाम मध्ये अंत्यविधी करण्यात आले.
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी, ज्येष्ठ साहित्यिक म्हणून अनिल सोनार यांची ओळख होती. अत्यंत संवेदनशील आणि मार्मिक भाषेमध्ये लिखाण करण्यात सोनार यांचा लौकीक होता. सारे प्रवासी तिमिराचे, मेंढरं, गणपत वाणी ही नाटकं खूप गाजलीत. प्राध्यापक सोनार यांनी शंभराच्या शंभर पेक्षा अधिक एकांकिका लिहिल्या होत्या या एकांकिका महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक गाजल्यात. प्राध्यापक सोनार यांचे 85 च्या वर पुस्तकं प्रकाशित असून राज्यस्तरीय अनेक मानाचे पुरस्कारही प्राप्त आहेत.
ML/ML/SL
23 Jan. 2025