ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’ पुरस्कार जाहीर

नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. जनस्थान हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा मानाचा पुरस्कार असून 10 मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आज (दि.27) आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ लेखक, साहित्यिक कुमार केतकर (, कुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी याबाबत घोषणा केली. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे जनस्थान पुरस्काराचे स्वरूप आहे.
ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षण दिले आहे. त्यांना आधुनिक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतीशील नाटककार म्हणून ओळखले जाते.
सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके
मिकी आणि मेमसाहेब
महानिर्वाण
महापूर
बेगम बर्वे
शनिवार रविवार
दुसरा सामना
अतिरेकी
एक दिवस माथाकडे एक दिवस मठाकडे
ठकीशी संवाद
SL/ML/SL
27 Jan. 2025