काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनींच्या पुत्राची काँग्रेसला सोडचिठ्ठी….

 काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के अँटनींच्या पुत्राची काँग्रेसला सोडचिठ्ठी….

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी पक्षाला निरोप दिला आहे. अनिल अँटनी यांनी मोदी आणि गुजरात दंगलीवर आधारित बीबीसीच्या माहितीपटाला विरोध करत नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता.Senior Congress leader AK Antony’s son bid farewell to Congress….

हे ट्विट डिलीट करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला, असे अनिल अँटनी यांनी म्हटले आहे. भारतीय संस्थांपेक्षा ब्रिटीश प्रसारकांच्या मतांना अधिक महत्त्व दिल्यास देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होईल. असे ते म्हणत होते .

“मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर एक ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणला जात होता. तोही त्यांच्याकडून जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभा राहण्याबाबत बोलतात, मी त्यांना नकार दिला.” असं त्यांनी ट्वीटद्वारे सांगितलं आहे.

अनिल अँटोनी यांनी ट्विट केले की, त्यांचे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत, पण तरीही त्यांना वाटते की या माहितीपटामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ शकतो. बीबीसी आणि ब्रिटनचे माजी परराष्ट्र सचिव जॅक स्ट्रॉ यांचे समर्थन करणारे काही लोक चूक करत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटावरून डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचे मंगळवारी दिसून आले. हा माहितीपट दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सादर होणार होता, मात्र त्यापूर्वीच तेथील वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले. दुसरीकडे केरळ आणि तेलंगणातील काही विद्यापीठांनी डॉक्युमेंटरी दाखवल्याबद्दल भाजपने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारकडून माहितीपटावर बंदी
बीबीसीच्या माहितीटावरून भारतात राजकीय पडसाद उमटल्यानंतर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार हा माहितीपट यूट्यूब आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव यांनी आयटी नियम, २०२१ अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत निर्देश जारी केले आहेत.

ML/KA/PGB
25 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *