भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

 भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन

नाशिक, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं आज निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. मधुकर पिचड यांचं आदिवासी भागात मोठं काम आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते. ते अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठीही त्यांनी मोठे काम केलं होते.

SL/ML/SL

6 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *