बाबासाहेब परीट यांची साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड

 बाबासाहेब परीट यांची साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड

सांगली, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांची भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ११ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या साहित्य अकादमीच्या संमेलनात कथाकथनासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील कथाकथनासाठी परीट यांची एकमेव निवड झाली आहे. परीट यांच्या निवडीमुळे सांगलीच्या साहित्य क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

बाबासाहेब परीट यांनी आजवर अखिल भारतीय साहित्य संमेलन सांगली,पुणे, ठाणे, डोंबिवली, चिपळूण, नाशिक अशा सहा संमेलनामध्ये निमंत्रित कथाकार म्हणून कथाकथन केले आहे.
सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनात बाबासाहेब परीट यांची कथा खूप गाजली होती . महाराष्ट्रातील मातब्बर व्याख्यानमालेमध्ये त्यांचे कथाकथन झाले आहे. यामध्ये नाशिकची वसंत व्याख्यानमाला राजगुरुनगरची साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला,बारामतीची शरद पवार यांच्या आईच्या नावाची शारदा व्याख्यानमाला यांसह चेन्नई,छत्तीसगड, कर्नाटक येथील अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांनी दर्जेदार कथा सादर करून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

परीट हे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून ही कार्यरत आहेत. शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या निवडीमुळे साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. Selection of Babasaheb Pareet for Storytelling in Sahitya Akademi Conference

ML/KA/PGB
5 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *