इतिहासात प्रथमच सीना नदीला महापूर…

सोलापूर दि २३:- सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील सीना नदीत सध्या 2 लाख 12 हजार 651 क्युसेक इतक्या विसर्गाने पाणी प्रवाहित होत आहे. इतिहासात प्रथमच सीना नदीला पूर आलेला दिसून येत आहे. माढा तालुक्यातील 16 गावात तर करमाळा तालुक्यातील 10 गावात सीना नदीचे पात्र सोडून पाणी शिरले गेले आहे. त्यामुळे साधारण 1800 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पूर परिस्थिती अत्यंत गंभीर होत आहे. माढा तालुक्यातील शिंगवाडीतील 9 लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद पथकही सर्वत्र तैनात आहे.