सीमावादातील ‘ती’ १४ गावे आता चंद्रपूर जिल्ह्यात…

चंद्रपूर दि १६:- तेलंगणाच्या सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ मराठी गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, यावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवनातील दालनात झालेल्या बैठकीत दिली.

बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, राजुराचे आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिवती तालुक्यातील १४ गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही गावे सीमावादामुळे तेलंगणात की महाराष्ट्रात, या संभ्रमात होती. यामुळे प्रशासन, सुविधा, विकास योजनांचा लाभयाबाबतीत गावांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.ML/ML/MS