मध्य आशियातील या देशात भारतीय विद्यार्थ्यांना Security Alert

 मध्य आशियातील या देशात भारतीय विद्यार्थ्यांना Security Alert

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किरगिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये स्थानिक आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. या हिंसाचारात पाकिस्तानातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी किर्गिझ विद्यार्थी आणि इजिप्शियन वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले होते. यानंतर हे प्रकरण आणखी वाढले आणि स्थानिक विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किर्गिस्तानमधील हिंसाचाराचे अनेक व्हिडिओ शेअर केले आणि मदतीचे आवाहन केले.दरम्यान किरगिझस्तानमधील हिंसाचाराच्या बाबतीतही भारत सतर्क आहे. झाला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी किर्गिस्तान प्रकरणात पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले की, बिश्केकमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सध्या परिस्थिती शांत असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दूतावासाच्या नियमित संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

SL/ML/SL

18 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *