हवाई सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत CrPC चे कलम १४४ लागू
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्षाच्या तयारीसाठी महानगरी मुंबई सज्ज होत असताना हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव २० डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान CrPC चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
CrPC च्या कलम 144 अंतर्गत ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर, पॅरा मोटर, हँड ग्लायडर आणि हॉट एअर बलून इत्यादींवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या काळात मुंबई पोलिसांना हवाई निगराणीतून सूट देण्यात येणार आहे. त्यासाठी उपायुक्तांची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. आदेशात म्हटले आहे की, जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याला आयपीसीच्या कलम 188 नुसार शिक्षा केली जाईल असे आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची त्याची प्रत पोलीस ठाणे, विभागीय एसीएसपी, झोनल डीसीएसपी, महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालय, तहसील आणि प्रभाग कार्यालयांच्या सूचना फलकावर लावावी, असे आदेशात म्हटले आहे. तसेच याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना माहिती देण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे.
SL/KA/SL
21 Dec. 2023