मराठी चित्रपटाला दुय्यम वागणूक-‘सनी’ चेअनेक शोज रद्द
मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या भाऊगर्दीत अनेक आशय संपन्न मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे चित्र राज्यभर सर्वत्रच दिसू लागले आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शीत आणि ललित प्रभाकर याची प्रमुख भूमिका असलेल्या सनी या चित्रपटाला देखील सध्या चित्रपटगृह मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. Sunny Marathi Movie Starring Lalit Prabhakar, Directed by Hemant Dhome.
सनी या चित्रपटाचे मुंबई सह राज्यभरातील अनेक चित्रपटगृहातील शोज प्रेक्षक संख्या कमी असल्याचे कारण देत रद्द करण्यात आले आहेत. तिकीट काढलेल्या प्रेक्षकांना पैसे परत केले जात आहेत.
चित्रपटाचे शोज परस्पर रद्द करण्याच्या या प्रकाराबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आवाज उठवला असून एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षकांना त्याच्या हक्काचे थिएटर एक आठवडा तरी मिळालेच पाहीजे अशी मागणी केली आहे. https://youtu.be/oaQTUbv6DJY
दरम्यान नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गोदावरी हा जितेंद्र जोशी अभिनित अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवलेला चित्रपट देखील चित्रपपटगृहांतून वगळण्यात आलेला आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रमोशन मध्ये सनी आणि गोदावरी या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र चित्रपटगृहांकडून शोज रद्द करण्यात आल्यामुळे प्रेक्षक नाराज होत आहेत.
SL/KA/SL
21 Nov. 20221