मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHO कडून मान्यता

 मलेरियाच्या दुसऱ्या लसीला WHO कडून मान्यता

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) R21 या जगातील दुसऱ्या मलेरिया लशीला मान्यता दिली आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवली आहे. पुढील वर्षापासून ते बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष बाब म्हणजे या लसीच्या डोस निर्मितीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सोबत दरवर्षी 10 कोटी डोस तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. एका डोसची किंमत साधारणपणे 166 ते 332 रुपये एवढी असेल.एखाद्या व्यक्तीला मलेरिया झाला असेल तर त्याला या लसीचे 4 डोस घ्यावे लागतील.

WHO ने 2021 मध्ये RTS,S/AS01 ही या मलेरियाची पहिली लस मंजूर केली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले- आम्ही २ वर्षांपूर्वी मलेरियाच्या पहिल्या लसीला मान्यता दिली होती. आता आमचे लक्ष जगभरात मलेरियाची लस तयार करण्यासाठी निधीची व्यवस्था करण्यावर असेल, जेणेकरून ही लस प्रत्येक गरजू देशापर्यंत पोहोचू शकेल.यानंतर संबंधित देशांची सरकारे ठरवतील की त्यांनी मलेरियावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांमध्ये लसीचा समावेश करावा की नाही.WHO महासंचालक गेब्रेयसस पुढे म्हणाले की – RTS,S/AS01 आणि R21 मध्ये फारसा फरक नाही. दोघांपैकी कोणता अधिक प्रभावी ठरेल हे सांगता येत नाही. दोन्ही प्रभावी आहेत.

ही लस प्लाझमोडियम फॅल्सीपेरमला निष्प्रभ करते. प्लाझमोडियम फॅल्सीपेरम हे मलेरियाला कारणीभूत असलेल्या पाच परजीवीपैकी एक आहे आणि ते सर्वात धोकादायक आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लस मलेरियाच्या प्रत्येक 10 पैकी 4 प्रकरणांना रोखू शकते आणि 10 पैकी 3 लोक गंभीर प्रकरणांमध्ये वाचवू शकतात.

SL/KA/SL

3 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *