लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदे काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. काँग्रेसने ८ मार्च रोजी ३९ जणांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात राहुल गांधींसह काही महत्त्वाच्या उमेदवारांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीत काँग्रेसने ४३ जणांचा समावेश केला आहे. ४३ उमेदवारांमध्ये १० जण खुल्या वर्गातील, १३ जण ओबीसी, १० SC, ९ ST आणि एका मुस्लीम उमेदवाराचा समावेश आहे.
काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना छिंदवाडामधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या राहुल कस्वान यांना चुरू मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यासह जोरहाटमधून गौरव गोगोई, सिलचरमधून सुरज्या खान, जालौरमधून अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांना उमेदवारी दिली आहे. या ४३ पैकी १३ उमेदवार ओबीसी आहेत. दुसऱ्या यादीनुसार काँग्रेसने अनुसूचित जातींमधील १०, अनुसूचित जमातींमधील ९, जनरल ९ आणि एक मुस्लीम उमेदवार दिला आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण ३९ नेत्यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. काँग्रेसने राहुल गांधी यांना पुन्हा एकदा वायनाडमधून (केरळ) उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
SL/ML/SL
12 March 2024