लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

 लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज असलेल्या भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं असून त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे.

दुसऱ्या यादीत 20 उमेदवारांची वर्णी

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारत पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित

दरम्यान २ मार्च रोजी भाजपने 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार असून ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या यादीत २८ महिलांना उमेदवारी दिली आहे.

ML/ML/SL

13 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *