ड्रोन बनवणाऱ्या कंपनीवर SEBI कडून कठोर कारवाई
मुंबई, दि. २९ : SEBI ने एसएमई क्षेत्रातील कंपनी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स लिमिटेड (DIAL) आणि तिच्या दोन प्रवर्तकांवर कठोर कारवाई केली आहे. कंपनीने IPO मधून जमा केलेल्या निधीचा गैरवापर केला, आर्थिक विवरणांमध्ये फेरफार केला आणि फसव्या कॉर्पोरेट घोषणा केल्याचे SEBIच्या तपासात उघड झाले आहे.
SEBI ने ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स (DIAL) आणि तिचे प्रवर्तक व व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव तसेच प्रवर्तक व मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निकिता श्रीवास्तव यांना सिक्युरिटीज बाजारात कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यापासून दोन वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे.
या कारवाईसह, कॉर्पोरेट सल्लागार फर्म इन्स्टाफिन फायनान्शियल ॲडव्हायझर्स एलएलपी (Instafin Financial Advisors), तिचे भागीदार संदीप घाटे आणि मायक्रो इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनाही बाजारातील व्यवहारांपासून रोखण्यात आले आहे. या सर्व संबंधित घटकांवर एकूण 75 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
कंपनी आणि प्रवर्तकांनी सर्व आरोपांना विरोध केला, त्यांचा युक्तिवाद होता की त्यांच्या कृतींना फसव्या योजनेचा भाग मानणे म्हणजे संपूर्ण लिस्टिंग प्रक्रियाच फसव्या ठरवणे होईल, जे चुकीचे आहे. या कारवाईनंतरही, सेबीने प्रवर्तक आणि इतरांना एक्सचेंज-ट्रेडेड डेरिव्हेटिव्ह करारांमधील सर्व ओपन पोझिशन्स बंद करण्याची परवानगी दिली आहे.
SL/ML/SL