Mutual fund गुंतवणूकदारांसाठी सेबी कडून KYC नियम शिथिल

 Mutual fund गुंतवणूकदारांसाठी सेबी कडून KYC नियम शिथिल

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Mutual Fund च्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची तरतूद बाजार नियामक सेबीने केली आहे. SEBI केवायसी नियम शिथिल करून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. यामुळे आधार-पॅन लिंक नसले तरीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येणार आहे.1 एप्रिल 2024 पासून लागू झालेल्या नियमांनुसार, आधार-पॅन लिंकिंगच्या अभावामुळे गुंतवणूकदारांचे केवायसी होल्डवर ठेवण्यात आले होते, ज्यामुळे गुंतवणूकदार कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकत नव्हते किंवा त्यांची गुंतवणूक पूर्ण रिडीम करू शकत नव्हते. नवीन नियमानुसार आधार-पॅन लिंक न करताही, गुंतवणूकदार त्यांचे केवायसी OVD अर्थात आधार, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या अधिकृतपणे वैध कागदपत्रांसह करू शकतात. अशा गुंतवणूकदाराची KYC स्टेटस KYC नोंदणीकृत असेल.

गुंतवणूकदाराला आपले स्टेटस तपासायचे असेल तर तो www.CVLKRA.com वर KYC तपासू शकतो.केवायसी इन्क्वाअरी पैज जाऊन गुंतवणूकदार त्यांच्या पॅन क्रमांकावरून केवायसी स्थिती तपासू शकतात. त्याच्या पेजवर गुंतवणूकदार त्यांचे केवायसी नोंदणीकृत अधिकारी देखील पाहू शकतात जसे की केआरए जसे सीएएमएस, कार्वी इ. जर गुंतवणूकदाराचे केवायसी प्रमाणित किंवा नोंदणीकृत नसेल, तर तो अधिकृतपणे वैध कागदपत्रांसह त्याच्या केआरएच्या वेबसाइटला भेट देऊन केवायसी करू शकतो. 14 मे रोजीच्या परिपत्रकात सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.

केवायसी नोंदणीकृत स्टेटस असलेला गुंतवणूकदार फक्त त्या फंडाशी व्यवहार करू शकतो ज्यासाठी केवायसी केले गेले आहे आणि इतर कोणत्याही नवीन फंडाशी नाही. तसेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने आधार-पॅन लिंक केले असेल आणि त्याचे केवायसी केले असेल, तर त्या गुंतवणूकदाराचे केवायसी स्टेटस प्रमाणित असेल. असे गुंतवणूकदार सर्व म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. केवायसी नोंदणीकृत गुंतवणूकदाराला नवीन फंडात गुंतवणूक करायची असल्यास त्याला पुन्हा केवायसी करून घ्यावे लागेल. जर केवायसी स्टेटस होल्डवर असेल तर गुंतवणूकदाराचा ईमेल, मोबाईल नंबर, पत्ता पडताळला जात नाही. केवायसी होल्डवर असलेले गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये व्यवहार करू शकणार नाहीत किंवा गुंतवणूक करू शकणार नाहीत किंवा त्यांना रिडीम करण्याची सुविधा मिळणार नाही.

SL/ML/SL

17 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *