Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना SEBI कडून कारणे दाखवा नोटीस

 Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना SEBI कडून कारणे दाखवा नोटीस

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : SEBI ने Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. Paytm ने बाजारात IPO दाखल केले तेव्हा विजय शेखर शर्मा यांना नॉन प्रमोटर म्हणून दाखवलं होतं. वास्तवात हे चुकीची क्लासिफिकेशन होतं, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. मात्र, Paytm ने IPO च्यावेळी आपल्या संस्थापकांना कशा प्रकारे क्वालिफाय केलं हा सवाल नसून, SEBI च्या रेग्युलेटरी फ्रेमवर्क आणि प्रमोटरच्या परिभाषेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Paytm चा IPO येऊन आता तीन वर्ष उलटली आहेत. सेबी पुन्हा एकदा प्रमोटर आणि नॉन प्रमोटरची क्लासिफिकेशन पाहत आहे. सेबीने अशा प्रकारे जुन्या प्रकरणांवर कारवाई करणे प्रमोटरच्या डेफिनेशन आणि आयपीओ प्रोसेसच्या दरम्यान झालेल्या सेबीचा निष्काळजीपणा दर्शवत नाही का? ज्या प्रकरणांमध्ये अप्रुव्हल देण्यात आले आहे, त्यांच्या संभाव्य परिणामांवर प्रश्न उपस्थित करत नाही का? असे सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

विजय शेखर शर्मा यांना सेबीने पाठवलेल्या नोटिशीत प्रमोटरच्या परिभाषेवर जोर देण्यात आलेला आहे. सेबीच्या इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स (आयसीडीआर) विनियमांमध्ये प्रमोटरला एका अशा व्यक्तीच्या रुपात परिभाषित करण्यात आलंय की, ज्याच्या नावाचा उल्लेख या रुपात डीआरएचपी वा कंपनीच्या अॅन्युअल फायनान्शिअल रिटर्नमध्ये समाविष्ट केलेलं आहे. किंवा आयपीओ आणणाऱ्यावर ज्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कंट्रोल असेल असा व्यक्ती प्रमोटर होऊ शकतो.

प्रमोटरच्या या परिभाषेत त्या व्यक्तीचाही समावेश आहे, ज्याच्या सल्ल्याने डायरेक्टिव्हवर कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर काम करण्यास उत्सुत असेल. प्रमोटर शब्दाची व्यापक परिभाषा कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या विस्तृत समूहाची साखळी आहे. त्याचबरोबर प्रमोटरांना कसे क्लासिफाय करण्यात यावं हा सवालही या निमित्ताने केला जातो. खासकरून मॉर्डन कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये जिथे कंपनींचं कंट्रोल अनेक लोकांच्या हाती असतं तिथे.

सेबीने प्रमोटरांना परिभाषित करण्यासाठी आपला दृष्टीकोण अपडेट करण्याची गरज असल्याचं ओळखलं आहे. त्याबाबत त्यांनी एका डिस्कशन पेपरमध्ये पर्सन्स इन कंट्रोल (पीएससी) ची गरज व्यक्त केली आहे. प्रमोटर, संस्थापक आणि नियंत्रक शेअर होल्डर्सच्यामधील अंतर स्पष्ट करणं आवश्यक झालं आहे. कारण आता कार्पोरेट भारताच्या कॅपिटल मार्केट आणि खासगी इक्विटी गुंतवणूकदारांकडून आधीपेक्षा अधिक गुंतवणूक करून घेत आहे. जश्या जश्या कंपन्या वाढत आहेत आणि त्यांची शेअरधारकता व्यापक होत आहे, प्रमोटरची पारंपारिक संकल्पना आता प्रासंगिक राहू शकत नाही.

SL/ML/SL

27 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *