महाविकास आघाडीचे जागा वाटप घोषित, काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी

 महाविकास आघाडीचे जागा वाटप घोषित, काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीने आपले राज्यातील जागावाटप अखेर आज जाहीर केले असून काँग्रेस पक्षात यामुळे प्रचंड नाराजी पसरली असून काही ठिकाणी बंडखोरीची भाषा करण्यात येत आहे. काँग्रेस , शिवसेना ऊबाठा आणि राष्ट्रवादी पवार गट वगळता अन्य कोणत्याही पक्षाला या वाटपात स्थान मिळालेले नाही.

आघाडीने सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडी , स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी जागा वाटप चर्चा सुरू ठेवल्या होत्या मात्र त्यांचे शेवटपर्यंत काही जमू शकले नाही. हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत आहेत तर आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही आपली स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीचे नेते शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले , बाळासाहेब थोरात यांनी हे जागावाटप जाहीर केले मात्र नाराज असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यावेळी गैरहजर होत्या. सांगली आणि भिवंडी इथे काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

आज जाहीर झालेले जागावाटप पुढीलप्रमाणे

  • -कांग्रेस -१७
  • -राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरद पवार) -१०
  • -शिवसेना (ठाकरे गुट) – २१

काँग्रेस – १७:-
नंदुरबार
धुळे
अकोला
अमरावती
नागपूर
भंडारा गोंदिया
गडचिरोली चिमूर
चंद्रपूर
नांदेड
जालना
मुंबई उत्तर मध्य
पुणे
लातूर
सोलापूर
कोल्हापूर
रामटेक
मुंबई उत्तर

एनसीपी शरद पवार – 10 :-
बारामती
शिरूर
सातारा
भिवंडी
दिंडोरी
माढा
रावेर
वर्धा
अहमदनगर दक्षिण
बीड

शिवसेना ठाकरे – 21 :-
जळगाव
परभणी
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
रायगड
मावळ
धाराशिव
रत्नागिरी
बुलढाणा
हातकणंगले
संभाजी नगर
शिर्डी
सांगली
हिंगोली
यवतमाळ
वाशीम
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई उत्तर पक्ष्चिम
मुंबई दक्षिण
मुंबई ईशान्य

ML/ML/SL

9 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *