कृष्णा नदीवर उद्या होणार Seaplane ची चाचणी

अमरावती, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जलपर्यंटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशभरातील मोठ्या नद्यांवर सी प्लेन ही सुविधा आणण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी चाचण्या सुरु झाल्या आहेत. जागतिक स्तरावरील सी प्लेन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कॅनडा येथील हॅवीलँड एअरक्राफ्ट कंपनीचे सिप्लेन दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद मध्ये आले असून उद्या त्याची विजयवाडा येथे कृष्णा नदीवर चाचणी होणार आहे. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू उपस्थित राहणार आहेत.दोन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील सीप प्लेन वाहतूकीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर कॅनडाने डीएचसी -६ ही ट्विन ऑटर क्लासिक ३०० जी जातीचे विमान भारतात पाठवले आहे. ही विमाने अहमदाबाद येथे आली असून त्यानंतर ती देशाच्या विविध भागात जाऊन प्रात्याक्षिक दाखवणार करणार आहे.
देशांतर्गत सीप्लेन सेवेला प्रोत्साहन देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. हे विमान उद्या विजयवाडाला जाणार असून त्यानंतर मैसूर, लक्षद्विप आणि नंतर शिलॉंगला जाणार आहे. विजयवाडा येथील कृष्णा नदीवर या विमानाच्या उड्डाण व उतरण्याचे प्रात्याक्षिक दाखवण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या साबरमती नदीवरुन स्टॅच्यू ऑफ लिबर्टी साठी सिप्लेन सेवा सुरु केली होती. ती केवळ काही दिवस चालली होती. पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ही सिप्लेन सेवा पुन्हा सुरु होणार आहे. या बरोबरच इतर अनेक प्रदेशातही ही सेवा सुरु होणार आहे.
SL/ML/SL
8 Nov. 2024