महापारेषणला स्कॉच पुरस्कार

 महापारेषणला स्कॉच पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी) : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ७६ व्या स्कॉच पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘पॉवर आणि एनर्जी’ या विभागांतर्गत ‘ईएचव्ही लाईन पॅट्रोलिंग’मध्ये ड्रोनचा उपयोग` यासाठी महापारेषणला राष्ट्रीय स्तरावर सिल्व्हर पारितोषिकाची घोषणा झाली.

महापारेषण कंपनीने दुर्गम भागातही ड्रोनच्या सहाय्याने वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व विजेचे वहन करण्यासाठी याचा वापर केला आहे.

स्कॉच ग्रुपच्या वतीने दरवर्षी शासन अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान, सांघिक नागरिकत्व, आर्थिक या क्षेत्रातील वाढीसाठी हा पुरस्कार दिला जातो.  महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी या यशाचे श्रेय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे.

SL/KA/SL

26 Jan.2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *