पावसामुळे नांदेड जिल्ह्यात शाळांना आज सुट्टी

 पावसामुळे नांदेड जिल्ह्यात शाळांना आज सुट्टी

नांदेड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात एलो अलर्ट जारी केला आहे. नांदेड जिल्ह्यात काल रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे जिल्हातील पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिले ते दहावी च्या सर्वच शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

पावसाचा जोर वाढल्याने काल शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा 11:30 pm वाजता उघडण्यात आला आहे* त्यामुळे, सदर प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. म्हणून बळेगाव बंधाऱ्याचा एक दरवाजा आज 11:30 PM वाजता उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. तरी गोदावरी नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ML/KA/SL

21 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *