नागपूरात शाळा सुरू, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

 नागपूरात शाळा सुरू, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

नागपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शाळेचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उत्कंठापूर्ण असतो. दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यानंतर आज शुक्रवारपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. नागपुरातील महानगर पालिकेच्या विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन तसेच त्यांच्यावर पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले.School starts in Nagpur, enthusiasm among students

यावेळेला शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश देखील वाटप करण्यात आले. शाळेला आणि वर्गाला देखील सजविण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसत होते. राज्यातील इतर भागांमध्ये 15 जून पासून शाळा सुरू करण्यात आल्या मात्र विदर्भातील तीव्र असणारी उष्णतेची लाट लक्षात घेतात आजपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने आज विदर्भातील सर्व शासकीय, निम शासकीय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळा सुरू झालेल्या आहेत.

ML/KA/PGB
30 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *