उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन उद्यापासून शाळा बंद
मुंबई , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील अनेक ठिकाणी उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन उद्यापासून शाळा बंद करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.हवामान खात्याने राज्यभर पुढील चार पाच दिवस तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. सध्या मुळातच सरासरी पेक्षा अधिक तापमान वाढ झाल्याचं दिसून येत आहे. नवी मुंबई इथे खारघरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १४ मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.या पार्श्वभूमीवर काही शाळांनी वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, यावर आज शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देखील उद्यापासून शाळा बंद करण्याची सूचना मंत्री केसरकर यांनी केली आहे .
ML/KA/PGB 20 APR 2023