अबब या रुग्णाने गिळली १८७ नाणी
बागलकोट,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकमधील बागलकोटमध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे. येथील 58 वर्षीय दायमाप्पा यांनी पाच रुपयांची 56 नाणी, दोन रुपयांची 51 नाणी आणि एक रुपयाची 80 नाणी अशी एकूण 462 रुपयांची 187 नाणी गिळ
दायमाप्पा यांना पोटदुखी आणि उलट्या होत होत्या. पोट फुग्यासारखे फुगले होते. डॉक्टरांनी एक्स-रे काढला तेव्हा त्याच्या पोटात नाण्यासारखे आकार दिसले. खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी एन्डोस्कोपी केली असता पोटात अनेक नाणी आढळून आली त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दायमाप्पा यांची मानसिक स्थिती ठीक नसून त्यांना स्क्रिझोफ्रेनिया नावाचा आजार आहे, पण ते त्यांचे नियमित काम करतात. त्यांनी नाणी गिळल्याचे कोणालाही सांगितले नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे उघडकीस आले, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.
SL/KA/SL
29 Nov. 2022
schizophrenic patient swallowed 187 coins