राष्ट्रवादी निवडणूक चिन्ह, सर्वोच्च न्यायालयात याचिका निकाली
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आज सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना समज देत चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांकडून घड्याळ या चिन्हाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. हे दोन्ही अर्ज आज कोटने निकाली काढले आहेत.या सुनावणी दरम्यान कोर्टाने दोन्ही पक्षांना समज दिली आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, अजित पवार गटाने आणखी ठळक शब्दांत एक मोठी जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध करावी. या जाहिरातीमध्ये व्यवस्थित नमूद करावे की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. घड्याळ या चिन्हाबाबत अंतिम निर्णय येईल त्यावर हे चिन्हाचं भवितव्य हे अवलंबून असेल. तर कोटनि शरद पवार गटाला सांगितले की, तुम्ही सुद्धा घड्याळ हे चिन्ह न वापरता फक्त तुतारी वाजवणारा माणूस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव वापरा, अजित पवार गटावर अवमान ठपका ठेवण्याची काही आवश्यकता नाहीये असंही कोर्टाने म्हटले आहे.
घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टान अजित पवार गटाला आदेश दिले होते की, घड्याळ या चिन्हाच्या संदर्भात कोर्टात प्रकरण सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच्या जाहिराती अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्या. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशाचे पालन अजित पवार गटाने कुठल्याही वृत्तपत्रातून केलेले नाहीये. तसेच निवडणूक प्रचार सुरू झाल्यावर न्यायालयाच्या आदेशातील शेवटची ओळ वगळण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करुन अजित पवार गटाने कोर्टाच्या आदेशाची थट्टा केली आहे अशी तक्रार शरद पवार गटाने केली होती.
अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी आक्षेप नोंदवत म्हटले की, शरद पवार गटाचे पदाधिकारी एनसीपी आणि घड्याळ चिन्ह वापरतातः तर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अजित त पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेठी जाहिरात दाखवत त्यामध्ये कोटनि सांगितत्या प्रमाणे सूचना नसल्याचं म्हटले. अजित पवार गट हा कोर्टाच्या नियमांचे, आदेशाचे पालन करत नाहीयेत त्यामुळे त्यांनी कोर्टाचा अवमान केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने म्हटले होते. यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर अवमान ठपका ठेवण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
SL/ML/SL
4 April 2024