SBI ने सर्वोच्च न्यायालयाला सादर केला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण डेटा

 SBI ने सर्वोच्च न्यायालयाला सादर केला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण डेटा

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : SBI ने आज सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक रोख्यांचा संपूर्ण डेटा सादर केला आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाला किती देणग्या मिळाल्या याची माहिती समोर येणार आहे. निवडणूक रोख्यांप्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) याचिकेवर होती. ज्यामध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या प्रत्येक निवडणूक रोख्याचा तपशील जाहीर करण्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवण्याची विनंती करण्यात आली होती. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने कठोरता दाखवत SBI ने उद्याच (मंगळवार) बाँडशी संबंधित सर्व माहिती द्यावी आणि निवडणूक आयोगाने १२ मार्चपर्यंत ती प्रसिद्ध करावी, असे सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला इशारा दिला होता की जर बँकेने १२ मार्चपर्यंत बाँडचे तपशील निवडणूक आयोगाकडे न दिल्यास त्यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई केली जाईल.

निवडणूक रोख्यांप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या डॉ. जया ठाकूर यांनी याचिका दाखल केल्यावर सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करायला १२ मार्चपर्यंत मुदत दिली होती. परंतु स्टेट बँकने हा तपशील देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. ही मागणी फेटाळत काल सुप्रीम कोर्टाने कठोर पवित्रा घेत आजच हा तपशील निवडणूक आयोगाला द्यायला सांगितला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एसबीआयने निवडणूक रोख्यांचा डेटा आज मंगळवार सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिला आहे

सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे घटनाबाह्य ठरवले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. त्यानंतर न्यायालयाने हे घटनाबाह्य ठरवले आणि EC ला देणगीदार, देणगी म्हणून दिलेली रक्कम आणि प्राप्तकर्ते १२ मार्चपर्यंत उघड करण्याचे आदेश दिले.

SL/ML/SL

12 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *