SBI चे शेअर्स सातत्याने तेजीत
मुंबई, दि. ६ : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI शेअरमध्ये आज 13.40 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. NSE वर SBIचा शेअर 1018.90 रुपयांवर तर BSE वर 1018.75 रुपयांवर बंद झाला. मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग वॉल्यूम असल्यानं शेअरमध्ये तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात स्टेट बँकेच्या शेअरनं दमदार कामगिरी केली आहे. या काळात स्टेट बँकेचा शेअर 27 टक्क्यांनी वाढला आहे.
SBI च्या शेअर मध्ये आलेल्या तेजीमुळं बँकेचं बाजारमूल्य 9.45 लाख कोटींवर पोहोचलं आहे. बँकेच्या शेअरमध्ये येत्या काही दिवसात तेजी कायम राहिल्यास 10 लाख कोटींचा टप्पा देखील पार होऊ शकतो. बँकिंग स्टॉकमध्ये बाजारमूल्याचा विचार केला तर सर्वाधिक बाजारमूल्य एचडीएफसी बँकेचं आहे. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 14.87 ट्रिलियन डॉलर्स इतकं आहे. त्यानंतर आयसीआयसीआयस बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेचं बाजारमूल्य 10.07 लाख कोटी आहे. या दोन खासगी बँकांनंतर तिसरा क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाचा लागतो.
SL/ML/SL