क्रांतीअग्रणी पुरस्कार सयाजी शिंदेंना जाहीर

 क्रांतीअग्रणी पुरस्कार सयाजी शिंदेंना जाहीर

सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘क्रांतीअग्रणी पुरस्कार’ अभिनेते सयाजी शिंदे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण ४ डिसेंबर २०२३ रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे प्रसिद्ध विचारवंत लेखक प्रा. डॉ. राजन गवस यांच्या हस्ते होणार आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या आधी कविवर्य नारायण सुर्वे, समाजसेविका मेधा पाटकर, शबाना आझमी, डॉ. श्रीराम लागू, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, डॉ. वसंतराव गोवारीकर, समाजसेविका डॉ. राणी बंग, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, पत्रकार पी. साईनाथ, डॉ. शिवानंद सोरटूर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते ए, बी, बर्धन, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. एन. डी. पाटील, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, प्रा. पुष्पा भावे, डॉ. रवींद्र कोल्हे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

ML/KA/SL

29 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *