सह्याद्री वन्यजीव रक्षण संस्थेने ओढ्यातील मगरीला दिले जीवदान.

अलिबाग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पाबरे गावाच्या नजदीक एका ओढ्यामध्ये भलीमोठी मगर आढळली असल्याचे स्थानिकांनी वनविभागाला कळविले होते.
महाकाय मगर मिळाल्याची माहिती वन विभागातर्फे मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था ही घटनास्थळी एका तासाभरात पोहोचली आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. मगरीचा आकार मोठा असल्याने बचाव कार्य करण्यासाठी त्यांनी अगदी नियोजित पद्धतीने बचाव कार्य केले.
वनविभाग तसेच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या टीमने अगदी शिताफीने त्या मगरीचे बचाव कार्य सुरू केले. मगरीचा आकार १३.४ फूट तर वजन २३० किलो इतके होते.
वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
PGB/ML/PGB
25 Oct 2024