सावंतवाडी जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली.

सिंधुदुर्ग दि ४– सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सावंतवाडी कारागृहाची किमान शंभर वर्षे जुनी मुख्य सुरक्षा भिंत आज दुपारी कोसळली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेसाठी सर्व कैद्यांना सिंधुदुर्ग येथील कारागृहात हलवण्यात आले. सावंतवाडी कारागृह हे संस्थानकालीन कारागृह आहे. ML/ML/MS