संवत २०८२: अर्थजगतातील अनिश्चिततेतून संधी शोधण्याचा काळ

जितेश सावंत
संवत २०८१ मध्ये भारतीय शेअर बाजाराने काहीसं शांत आणि मर्यादित परतावा दिला. जागतिक पातळीवरील अनिश्चितता, वाढलेले बाजारमूल्यांकनं आणि कंपन्यांचे संमिश्र निकाल यांच्या पार्श्वभूमीवर, निर्देशांकांनी मर्यादितच परतावा दिला. नव्या संवत २०८२ मध्ये मात्र, अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ब्रोकरेज हाऊसेसनी आशावाद आणि सावधगिरी यांचा समतोल साधणारा दृष्टिकोन मांडला आहे.

मागील संवत २०८१ ची झलक
सेन्सेक्स: +3.3%
निफ्टी: +3.9% (तिन्ही वर्षांतील सर्वात मंद वाढ)
BSE मिडकॅप: -0.1% (३ वर्षांत पहिल्यांदा घसरण)
BSE स्मॉलकॅप: -4.3% (६ वर्षांत पहिल्यांदा घसरण)
जरी परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली, तरीही देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून ₹5.8 लाख कोटींची भरघोस गुंतवणूक झाली, जी बाजारासाठी मोठा आधार ठरली.
जागतिक बाजारातील कामगिरी
Nasdaq: +23%
S&P 500: +14%
Dow Jones: +7%
FTSE 100 (UK): +16%
CAC 40 (France): +11%
DAX (Germany): +33%
शांघाय कम्पोझिट (चीन): +22%
हँगसेंग (होंगकाँग): +32%
कोस्पी (द. कोरिया): +27%
निक्केई (जपान): +14%
संवत २०८२ मध्ये काय अपेक्षित ?
ब्रोकरेज हाऊसेसचा दृष्टीकोन:
कोटक सिक्युरिटीज:
निफ्टी ५० ची कमाई FY27 मध्ये १८% वाढेल.
पुढील १२–१५ महिन्यांत माफक परतावा अपेक्षित.
उच्च मूल्यांकनामुळे मोठी उसळी मर्यादित राहू शकते.
नुवामा रिसर्च:
US फेड आणि ECB दरकपात करतील अशी शक्यता.
RBI देखील हळूहळू दरकपात करेल.
मिड/स्मॉलकॅपमध्ये स्थिरता येईल पण मध्यम मुदतीत सकारात्मक दृष्टीकोन.
HDFC सिक्युरिटीज:
अमेरिका-चीन व्यापार तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी अडचणीत येऊ शकते.
फायनान्स, इंजिनीअरिंग, पॉवर आणि कंझम्प्शन क्षेत्रात निवडक संधी.
SBI सिक्युरिटीज:
भारतात डबल डिजिट कमाई वाढ, स्वस्त क्रूड आणि उत्सवकालीन खप हे सकारात्मक घटक.
संधीची क्षेत्रं: ऑटो, NBFCs, फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, सिमेंट, रीसायकलिंग, हॉटेल्स, हॉस्पिटल्स.
मिराए अॅसेट शेअरखान:
भारताची दीर्घकालीन अर्थवाढ मजबूत.
लार्ज कॅप शेअर्सकडे लक्ष वळेल.
मिड/स्मॉलकॅपमध्ये थोडी विश्रांती अपेक्षित.
लेखकाचे वैयक्तिक मत:

संवत २०८२ हे वर्ष शेअर बाजारासाठी गोंधळाचे आणि अस्थिरतेने भरलेले असू शकते. मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होण्याची शक्यता असून, अनेक वेळा हे चढ-उतार फसव्या ठरू शकतात ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी योग्य निर्णय घेणं कठीण होईल. काही काळासाठी मंदीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे वर्ष सतत चढ-उतारांचे असून गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा, चुकीच्या निर्णयांमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.
गुंतवणूकदारांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
दीर्घकालीन विचार ठेवा, आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा.
बाजारातील प्रत्येक चढ-उतारामागे न धावता, मूलभूत (fundamental) विश्लेषणावर आधारित निर्णय घ्या.
लार्ज कॅप शेअर्समध्ये स्थिरतेची संधी आणि मिड/स्मॉलकॅपमध्ये चाचपणीने गुंतवणूक गरजेची आहे.
जागतिक घडामोडींवर सतत लक्ष ठेवा विशेषतः अमेरिका, चीन आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवर.
(लेखक , शेअरबाजार आणि सायबर कायदा (Cyber law)/ डेटा संरक्षण कायदा तज्ज्ञ (Data Protection law) / डिजिटल पुरावा तज्ज्ञ (Digital Evidence Specialist) यातील तज्ञ आहेत)ML/ML/MS