RBI पोर्टलवरून खरेदी करता येणार सेव्हिंग्ज बाँड्स

 RBI पोर्टलवरून खरेदी करता येणार सेव्हिंग्ज बाँड्स

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आता रिटेल गुंतवणूकदार आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट पोर्टलद्वारे फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स, 2020 (करपात्र) खरेदी करू शकतात. “रिटेल डायरेक्ट पोर्टलद्वारे ऑफर केलेल्या उत्पादनांच्या श्रेणीचा विस्तार करत रिझर्व्ह बँकेने भारत सरकारशी सल्लामसलत करून फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बाँड्स, 2020 (करपात्र) म्हणजेच FRSB 2020 च्या खरेदीला देखील परवानगी दिली आहे,” असे RBI ने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 नोव्हेंबर 2021 रोजी आरबीआय-रिटेल डायरेक्ट योजना सुरू केली होती. या योजनेने गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करून किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक सुलभ केली आहे. योजनेअंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार ऑनलाइन पोर्टलच्या मदतीने रिटेल डायरेक्ट गिल्ट खाते आरबीआयमध्ये उघडू शकतात. त्या खात्याचा वापर करून प्राथमिक आणि दुय्यम बाजारात सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येते.

FRSB हे केंद्र सरकारने जारी केलेले रोखे आहेत. ज्यांचा व्यवहार करता येत नाही. हे रोखे जारी केल्याच्या तारखेपासून सात वर्षांनी परत केले जातात. यापूर्वी, किरकोळ गुंतवणूकदारांना या पोर्टलद्वारे केंद्र सरकारच्या रोखे, ट्रेझरी बिले, राज्य सरकारी रोखे आणि सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी होती.

SL/KA/SL

24 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *