स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त जन्मस्थानीअभिवादन
नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा करून जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य
लढ्यांमध्ये सर्वस्व देणारे स्वातंत्र्यवीर, उत्कृष्ट कवी, साहित्यिक, विज्ञानवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि द्रष्टे विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 58 व्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील भगूर या त्यांच्या जन्मगावी असलेल्या सावरकर स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी अबाल वृद्ध नागरिक शालेय विद्यार्थी यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.
सावरकर स्मारक येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमांमध्ये नाशिक येथील सावरकर प्रेमी गायक चारुदत्त दीक्षित आणि भाग्यश्री वाद्य वृंदाच्या कलाकारांनी प्रतिवर्षाप्रमाणे सावरकरांच्या गीतामधून सावरकरांना अभिवादन केले. गायक चारुदत्त दीक्षित आणि त्यांचा बागेश्री कला वाद्यवृंद अनेक वर्षापासून सावरकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर करून या ठिकाणी सावरकरांवरील प्रेम व्यक्त करत असतात, तर नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या तालावर सावरकरांना मानवंदना दिली.
याशिवाय शहरातील इतर अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी ही सावरकर स्मारकाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सावरकर स्मारकांमधील सावरकरांचे विविध फोटो पाहून इतिहासातील विविध घटनांची माहिती घेतली तसेच सावरकरांना अभिवादन करण्यासाठी कारगिल युद्धामध्ये आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावूनही समाजासाठी सक्रिय राहून विविध लोकोपयोगी कामे करणारे निवृत्त लष्करी जवान दीपचंद यांनीही सावरकर स्मारक येथे येऊन सावरकरांना अभिवादन केले .
नाशिक येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावरकरांच्या पुतळ्यासमोर सागरा प्राण तळमळला या गीताचे सामुदायिक गायन केलं आणि सावरकरांना आदरांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी सावरकर स्मारकाला भेट देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी सावरकरांच्या चरित्र चरित्राविषयी आपल्या भाषणातून सावरकरांचे जीवन चरित्र जाणून घेतले. यावेळी मार्गदर्शन करताना सावरकर स्मारकासाठी विशेष प्रयत्न करणारे भगूर येथील हिंदू परिषदेचे जेष्ठ नेते एकनाथराव शेटे यांनी सांगितले की
सावरकरांचे संपूर्ण जीवन चरित्र हे देशासाठी लढण्याची अशी प्रेरणा देणारे आहे .
सावरकर स्मृती दिनानिमित्त जन कल्याण या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यालाही उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ML/KA/PGB 26 Feb 2024