सौंदत्ती यात्रेकरू कोल्हापुरात परतले
कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला गेलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या तसंच खासगी 147 बसेस (वाहनं) सौंदत्तीहून कोल्हापूरला सुखरूप परतल्या आहेत. Saundatti pilgrims returned to Kolhapur
कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला गेलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तसंच खासगी 147 एसटी बसेस आणि प्रवासी वाहनं आज सौंदत्तीहून सुरक्षित आणि सुखरूप रवाना करण्यात आल्या आहेत. त्या एसटी बसेस आणि प्रवासी वाहनं आज कोल्हापूरला परतल्या आहेत.
यासाठी कर्नाटक पोलिसांचं विशेष सहकार्य लाभलं. त्याबद्दल कर्नाटक पोलिसांप्रति महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
काल रात्री अकरा वाजता अकरा वाजल्यापासून ते आज पहाटे एक वाजेपर्यंत सर्व एसटी बसेस आणि प्रवासी वाहनं सौंदत्ती डोंगरावर एकत्र आणून त्यांना कोल्हापूरला रवाना करण्यात आलं. यासाठी कर्नाटक पोलिसांचं विशेष सहकार्य लाभलं, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक अतुल मोरे यांनी सांगितलं.
दरवर्षीप्रमाणे कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भावी गेले आहेत.सीमा वादाच्या सध्याच्या या तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सौंदत्ती डोंगरावर गेलेल्या तसंच यात्रेला जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील रेणुका भक्तांची योग्य ती सुरक्षा पुरविण्याची मागणी विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून गेले तीन-चार दिवस करण्यात येत आहे.
ML/KA/SL
8 Dec. 2022