हज यात्रेबाबत सौदी अरबने घेतला मोठा निर्णय

रियाध, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हज यात्रा २०२५ साठीचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे असे सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हज यात्रे संदर्भात सौदी अरबने मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे हजयात्रेत लहान मुलांवर बंदी घातल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरबच्या हज आणि उमरा मंत्रालयालच्यावतीने हा निर्णय घेतला आहे. हज यात्रेला दरवर्षी वाढणारी गर्दी पाहून आता लहान मुलांवर हजयात्रेवर बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सौदी अरबच्या नवीन व्हीसा नियमांनुसार अल्जेरिया, बांगलादेश, इजिप्त, इथोपिया, भारत, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मोरक्को, नाइजेरिया, पाकिस्तान, सूदान, ट्यूनीशिया आणि यमन यादेशांच्या व्हीसा नियमात बदल केले आहेत.
सौदी अरब सरकारने या देशांबरोबरच्या पर्यटन, व्यापार आणि कौटुंबिक प्रवासासाठीच्या बहु – प्रवेश व्हीसांना अनिश्चित काळासाठी निलंबित केले आहे. आता नव्या नियमांनुसार या देशाचे नागरिक आता ते केवळ एकल प्रवेश व्हीसासाठीच अर्ज करु शकतात, जो केवळ तीस दिवसांसाठी व्हॅलिड आहे.
२०२५ मध्ये हजयात्रेसाठी त्याच लोकांना प्राधान्य दिले जाईल जे पहिल्यांदा हज यात्रेवर चालले आहेत. लहान मुलांवरील बंदी मागे लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणांपासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
SL/ML/SL
10 Feb. 2025