नवयान बौद्ध युवा संघाच्या वतीने ९९ वा सत्याग्रह दिन उत्साहात साजरा

 नवयान बौद्ध युवा संघाच्या वतीने ९९ वा सत्याग्रह दिन उत्साहात साजरा

महाड, दि ३०
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत मानवमुक्तीचा निशस्त्र लढा उभारला. या सत्याग्रहातून समाजातील विषमतेला सुरुंग लावून समतेचा पाया रचला गेला. या ऐतिहासिक घटनेला २० मार्च २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण झाली.

या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने महाड येथे दाखल झाले होते. आलेल्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नवयान बौद्ध युवा संघ, महाड-पोलादपूर-माणगाव यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल निकम यांच्या अध्यक्षतेखाली मोफत भोजनदान, अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा तसेच भीम गीतांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यासोबतच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळाही पार पडला.

चवदार तळे व क्रांती स्तंभ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच ऐतिहासिक बौद्ध लेणी गांधार पाले येथे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या वेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार व मनोगतांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला नवयान बौद्ध युवा संघ, महाड-पोलादपूर-माणगावचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *