आशिया चॅम्पियनशिपमध्ये सात्विक-चिरागची सुवर्णकामगिरी
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने आज रविवारी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अशी सुवर्ण कामगिरी करणारी चिराग-सात्विकची जोडी भारतातील पहिली ठरली आहे. गतवर्षीही या जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं.
दुबईत खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ओंग यू सिन आणि टियो ई या मलेशियाच्या जोडीचा ६७ मिनिटांत १६-२१,२१-१७,२१-१९ ने पराभव केला. १९७१ ला दिपू घोष आणि रमन घोष यांनी या स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होतं.
बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे अभिनंदन केले.
कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा खन्ना हा एकमेव भारतीय आहे, त्याने 1965 मध्ये लखनऊमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करुन ही कामगिरी केली होती.
SL/KA/SL
1 May 2023