पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सात्विक-चिरागचा बॅडमिंटन सामना रद्द, जर्मन संघाची माघार

पॅरिस ऑलिंपिकच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या बॅडमिंटनमन सामना रद्द करण्यात आला आहे. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सोमवार २९ जुलैला दुपारी सामना होणार होता. तो सामना रद्द करण्यात आला आहे. जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि मार्विन सीडेल यांच्याविरुद्धचा पुरुष दुहेरी गटात हा सामना होणार होता. पण दुखापतीमुळे जर्मन संघाने या सामन्यातून माघार घेतली आहे. पहिल्या सामना जिंकल्यानंतर सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला आणखी दोन सामने खेळायचे होते, मात्र दुसरा सामना रद्द झाल्यामुळे ही भारतीय जोडी आता एकच सामना खेळणार आहे.