महायुती सरकारला सत्तेचा माज
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि १८
महायुती सरकारला सत्तेचा माज असून या सत्तेमध्ये चड्डी बनियान गँग असून हीच चड्डी बनियान गँग हे सरकार चालवत आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवनात अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ते पुढे म्हणाले या सरकारच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून या सरकारन राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. ह्या विधानभवनात हाणामाऱ्या होतात हे लोकशाहीला फार घातक आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सगळे मुंबईतील उद्योग गुजरातला घेऊन गेले काकडी मुंबई आहमदाबाद हे बुलेट ट्रेन कोणी सुरू केले याचे उत्तर तुम्हीच आम्हाला द्या. शेतकऱ्यांसाठी असलेली विमा योजना देखील सरकारने फसवी करून टाकली आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही.KK/ML/MS