तेली समाजाने केला विविध मान्यवरांचा सत्कार

 तेली समाजाने केला विविध मान्यवरांचा सत्कार

मुंबई, दि ८
लोअर परळ येथील तेली सेवा समाज या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी, पदवीधर, कलाकार, सहकार क्षेत्र आणि जेष्ठ ज्ञाती बांधवांचा सत्कार नुकताच परळ येथील भावसार सभागृह येथे करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जनार्दन गव्हाणकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंतांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात शिवाजीराव नलावडे यांच्या बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक व विविध संस्थेत सहकार कार्य करणारे धनंजय कुवेसकर यांना सन्मानित करण्यात आले.
तेली समाज नेहमीच समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करत असतो. तसेच विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यात देखील तेली समाज हा नेहमी अग्रेसर असतो. तेली समाजाने अशाच प्रकारे समाजात सामाजिक योगदान द्यावे आणि आपल्या समाजाचे नाव मोठे करावे. त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागली तर त्यांनी आम्हाला कळवावे आम्ही ते जरूर पूर्ण करणार असल्याची ग्वाही सहकार तज्ञ धनंजय कुवेस्कर यांनी दिली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डाॅक्टर निलेश पाठक, सविंद किशोर नांदलस्कर, अशोक पावसकर, अरूण शिवाजी गोंगाडे, कु. अद्वैत किशोर नादावडेकर, विश्वेश्वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप केळंबेकर आणि इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *