महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर!

मुंबई दि १३ : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संचालक मंडळाची ८५ वी बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील तसेच बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी दीपावली सणानिमित्त महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹५०,०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली. तसेच मंडळात बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त (कंत्राटी) कर्मचाऱ्यांना प्रथमच प्रत्येकी ₹२०,०००/- इतके सानुग्रह अनुदान देण्याची ऐतिहासिक घोषणा देखील यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केली.
या निर्णयामुळे महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दीपावली सणाचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला असून या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी यावेळी मंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच मंडळाच्या कार्यक्षमतेत सातत्याने वाढ घडवून आणण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.ML/ML/MS