सराटी येथील नवीन नवरीने सराटीवासीयांना नखे दाखवायला केली सुरुवात

 सराटी येथील नवीन नवरीने सराटीवासीयांना नखे दाखवायला केली सुरुवात

मुंबई, दि 30
नखरेसराटी येथील नव्या नवरी ने इंदापूरवाशींना नखरे दावण्यास सुरुवात केली आहे. सराटीच्या टोल चालकांची मुजोरी इतकी वाढली आहे की चक्क वाहनधारक चालकांना मारण्यास त्यांनी गावगुंड ठेवले आहेत.
सराटी गावच्या हद्दीत नव्यानेच उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावर वाहन चालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून टोल नाक्यावर कर्मचारी की गावगुंड असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल रात्रीच्या सुमारास इंदापूरकडून अकलूजच्या दिशेने इंदापूरचा वाहन चालक आपली मालवाहतूक गाडी घेऊन चालला होता. त्या वाहनचालकाच्या गाडीचा फास्टट्रॅक ही चालू होता. तरीपण वेळेचा अपव्य टाळण्यासाठी त्या वाहन चालकाने टोल नाका चालकाला विचारणा केली असता त्या वाहन चालकाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. काही वेळाने त्या टोल चालकाने सराटी येथील गावगुंडांना बोलावून पुन्हा वाहनधारक चालकास बेदमपणे मारहाण केली आहे. यावेळी सदर घटना ठिकाणी पोलिसांना येण्यास विलंब झाला.
सदर घटनेत वाहनधारक गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुल्लक कारणावरून एका वाहनधारक चालकाला सराटीच्या टोल नाक्यावरील गुंडांकडून बेदम मारहाण होऊनही पोलिसांची बघायची भूमिका दिसून येत आहे. इतकी मोठी घटना होऊनही अद्याप पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला दिसून येत नाही.
सदर घटने संदर्भात इंदापूर तालुक्यातून जनतेने नाराजी व्यक्त केली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *