जनता नगर आणि काशीचर्च बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा

 जनता नगर आणि काशीचर्च बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा

मीरा-भाईंदर दि ५ : बीएसयूपी (Basic Services for Urban Poor) योजनेअंतर्गत गेल्या १६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करणारे जनता नगर आणि काशी चर्च परिसरातील रहिवासी यांनी अखेर शेवटी परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या कडे मदतीसाठी धाव घेऊन गेले. शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी त्रस्त नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मंत्री सरनाईक यांच्या समोर मांडल्या.

या प्रतिनिधी मंडळात एकूण ४१३६ झोपडपट्टीधारकांचा सहभाग होता. यापैकी फक्त ४१० नागरिकांना घरे मिळाली असून उर्वरित लाभार्थ्यांना निधी अभावी घरे उपलब्ध करून देता येत नसल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात येत असल्याची माहिती रहिवाशांनी मंत्र्यांना दिली. त्याचसोबत या बैठकीत काही पात्र लाभार्थी देखील सहभागी झाले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार घर प्राप्त झाले परंतु तिथे आवश्यक सोयींचा तुटवडा असल्या कारणाने राहणे हालाकीचे असल्याची बाब लक्षात आणून दिली. इलेक्ट्रिसिटी आणि पाणी याशिवाय राहणे गैरसोयीचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

या योजनेसाठी एकूण १५६ कोटी रुपयांची तरतूद असूनही केवळ ४० कोटी रुपयांचा निधीच महापालिकेला प्राप्त झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. या सर्व समस्या आणि आकडेवारी यावर सविस्तर चर्चा करताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वांच्या व्यथा मनःपूर्वक ऐकून घेत निर्णायक आश्वासन दिले.

यावेळी जनतेशी संवाद साधत असताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणे ही केवळ योजना नाही, तर आपल्या सरकारची सामाजिक बांधिलकी आहे. बीएसयूपी योजनेतील एकही पात्र कुटुंब घराविना राहणार नाही. उर्वरित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करीन आणि महानगरपालिकेला निधी प्राप्त होताच वितरण प्रक्रियेला गती दिली जाईल.”

तसेच त्यांनी स्पष्ट सांगितले की, उर्वरित निधी लवकरात लवकर महानगरपालिका कडे उपलब्ध करून देण्यात येईल. संबंधित खात्यांसोबत पाठपुरावा करून थकीत रक्कम तातडीने सोडवली जाईल. तसेच महापालिकेत आयुक्तांच्या उपस्थितीत तातडीची विशेष बैठक बोलावून हा विषय प्राधान्याने निकाली काढला जाईल. जनता नगर आणि काशी चर्च येथील पात्र नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

राहिवाश्यांच्या १६ वर्षांच्या प्रतीक्षेला न्याय मिळावा यासाठी मंत्री सरनाईक यांनी दाखवलेला सकारात्मक आणि ठोस प्रतिसाद यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये दिलासा आणि समाधान व्यक्त करण्यात आले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *