सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकार वरील विश्वास दर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला शिवसेनेचे उदय सामंत , भाजपाचे डॉ. संजय कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील तसेच अपक्ष रवी राणा यांनी चार स्वतंत्र ठराव यासंदर्भात मांडले होते.
विश्वासदर्शक ठराव सादर होताच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ते मतास टाकले. यावेळी आवाजी मतदानाने सभागृहात ते मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधी सदस्यांनी नकारात्मक कोणतेही भाष्य केले नाही तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सदस्य सभागृहात आज सकाळपासूनच अनुपस्थित होते. यामुळे 5 डिसेंबरला अस्तित्वात आलेल्या नवीन सरकारने विश्वास दर्शक ठराव जिंकून राज्यपालांनी दिलेल्या निर्देशाची पूर्तता आज करण्यात आली आहे.
सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर
ML/ML/PGB 9 Dec 2024