अनियमित पर्जन्यमानामुळे संत्र्याची फुलगळती, उत्पादनात घट.

वाशीम दि ३०:– वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा परिसराला ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळखले जाते. परंतु यंदा अनियमित पावसामुळे या भागातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. मे महिन्यात अतिवृष्टी आणि जून महिन्यात कमी पावसामुळे हजारो एकरांवरील संत्रा बागांमध्ये फुलगळणी झाली. त्यामुळे या वर्षी संत्रा झाडांना फळच येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या परिसरात एकाही झाडाला संत्र्याचे फळ लागलेले नाही. संत्रा हा वनोजा परिसराचा प्रमुख हंगामी उत्पादनाचा आधारस्तंभ असून, संत्रा न आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले आहे. शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.ML/ML/MS