सांताक्रुज बेस्ट आगारातील वाहकाच्या मृत्यूने कर्मचारी संतप्त

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सांताक्रुज बेस्ट बस आगार येथे कार्यरत असलेल्या बसवाहक काकडे (वाहक क्र.122450) शनिवार ता.13 रोजी कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना मातेश्वरी कंपनीने कोणतीही वैद्यकीय ट्रीटमेंट देण्यात आली नसल्याचे कामगारांना समजल्यानंतर त्यांनी आक्रोश व्यक्त केला.
या संदर्भात सांताक्रुज आगारामधील बस वाहक काकडे हे सांताक्रुझ आगार ते कुलाबा आगार ड्युटी बस क्रमांक सी – 1 करीत असताना कुलाबा आगार येथे -1.00 वाजता त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. तरी हे वाहक बेस्ट मध्ये वेटींग लिस्ट कर्मचारी असून बीएसटीने याच्यावरती पर्याय काढला नसून किंवा मातेश्वरी कंपनीचा कोणताही अधिकारी किंवा आगार व्यवस्थापक यांनी घडलेल्या ठिकाणी चौकशी करण्याची साधी तसदी घेतली नाही किंवा दवाखान्यात ठिकाणी पोचले नाहीत असे संतप्तपणे बेस्ट कामगार संजय साळे यांनी म्हटले.
अशा अनेक घटना वारंवार घडल्या आहेत. प्रतीक्षा नगर आगार मध्ये बस चालक साळुंखे यांचा 348 गाडीवर असताना अचानक मृत्यू झाला तरी कंपनीने कोणताही निर्णय घेतला नसून किंवा त्याच्या कुटुंबाला कोणतीही मदत केली नाही अशा घटना वारंवार घडत असून मातेश्वरी कंपनीमध्ये चालक वाहकांचा प्रचंड असंतोष उडाला आहे कारण चालक वाहक कामगार वर्गाला ठेकेदारी कंपनी मदत करत नाहीत.
या उलट मानसिक ताण देतात याच्यामुळे ह्या घटना वारंवार घडत आहेत याच्यावरती बेस्ट प्रशासन न्याय देणार का व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का ही घटना बेस्ट कर्मचाऱ्यात जर घडली असती तर 50 लाख व त्याच्या घरातील एक व्यक्ती बेस्ट प्रशासन मध्ये समाविष्ट करून घेण्यात पण वेटलिस्ट वाल्या कर्मचाऱ्यांना काय देणार व याला उपाय काय व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुढे काय करावे याच्यावरून असे सिद्ध होते की वेटलिस्ट कर्मचाऱ्यांचे आयुष्य संपूर्ण धोक्यात आहे व त्याला प्रायव्हेट कंपन्या योग्य तो न्याय देत नाही मानसिक तान तुटपुंजा पगार यांना बेस्ट योग्य तो न्याय देणार का असा सवालही संजय साळे यांनी शेवटी उपस्थित केला आहे.
SW/ML/SL
15 April 2024