संत ज्ञानेश्वर महाराजांचे दुसरे गोल रिंगण खुडूसला
सोलापूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुसरे गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील खुडूस या ठिकाणी झाले. खडूस येथे पावसाच्या हलक्या सरींच्या साक्षीने सर्वप्रथम अश्व रिंगणात धावले. यानंतर विणेकरी व टाळकरी यांनी देखील रिंगणात तीन चकरा मारत विठू नामाचा जयघोष केला. यानंतर माऊली आज वेळापूर मुक्कामी जाऊन पोहोचली आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे माळीनगर येथे उभे रिंगण होऊन तुकाराम महाराज बोरगाव मुक्कामी पोहोचले आहेत..
ML/KA/PGB 25 Jun 2023